साखर

आमच्या कारखान्याची प्रती दिन 5,000 मे.टन ऊस गाळप करण्याची क्षमता आहे. ऑटो फीड कंट्रोल सिस्टीम हे त्याचे वैशिष्ट आहे. ही यंत्रणा उत्पादकता वाढविण्यासाठी मदत करते. कारखान्यात बसविलेली अत्याधुनिक सायलो सिस्टीम साखर प्रभावीपणे थंड करण्याचे काम करते. ही यंत्रणा साखरेचे वजन व पोती शिवण्याच्या स्वयंचलीत यंत्र॑णेशी संलग्न आहे.

प्रकिया : डबल सल्फिटेशन

उत्पादन : प्लांटेशन व्हाईट शुगरएम 30 साखर (मध्यम आकाराची)

एम 30 साखर (मध्यम आकाराची) - एकूण साखर उत्पादनाच्या 20 ते 25 टक्के

ठळक वैशिष्ठे
  1. इकुम्सा कलर जीएस 2/3-10 पद्धतीने 60 ते 80 - आय.यू.
  2. आकारमान 1.20 - ते 1.70 एम्.एम. [ 80 टक्के युनिफॉर्म ग्रेन साईज ]
  3. पोलरायझेशन 99.8 च्या वर
  4. आर्दता % : 0.02 ते 0.03
  5. SO2 चे प्रमाण : 20 पी.पी.एम. च्या खालीएस-30 साखर [लहान आकारमान]

एस-30 साखर (लहान आकारमान) : एकूण साखर उत्पादनाच्या 75 ते 80 टक्के

ठळक वैशिष्ठे
  1. इकुम्सा कलर जीएस 2/3-10 पद्धतीने 55 ते 70 आय.यू.
  2. आकारमान 0.60 ते 1.17 एम्.एम. व 0.80 ते 1.10 एम्.एम. [80 टक्के युनिफॉर्म ग्रेन साईज]
  3. पोलरायझेशन 99.8 च्या वर
  4. आर्दता % : 0.03
  5. SO2 चे प्रमाण : 20 पी.पी.एम. च्या खाली


पोती भरण [बॅगिंग]

शुभ्र दाणेदार साखर 50 किलोग्राम क्षमतेच्या ज्यूट पोत्यांमध्ये तसेच पी.पी. बॅगज मध्ये भरली जाते. साखर वजन करण्याची व ती पोत्यांमध्ये भरण्याची यंत्रणा स्वंयचलित आहे.


बातम्या आणि घटना

सर्व हक्क राखीव. कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड.